बाईक ऍम्ब्युलन्स

राज्याच्या दुर्गम व डोंगराळ भागात नवीन बाईक ऍम्ब्युलन्स सुरू करण्यात आलेल्या आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या विषयी पुढाकार घेतलेला आहे. मुंबईत ही सेवा सुरू झाल्यापासून पाच महिन्यांमध्ये १००० पेक्षा जास्त रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. अरुंद रस्ते व डोंगराळ भागात जिथे चारचाकी रुग्णवाहिका नेणे अशक्य आहे त्या ठिकाणी या बाईक ऍम्ब्युलन्सने सहजरीत्या पोहचणे शक्य आहे. १ ऑगस्ट २०१७ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत बाईक ऍम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे.

मराठी